अभिषेक -टिलक उपनाशी, पंजाबी, पंजाबीचे खेळ पंजाबच्या खेळावर उद्भवले.
कानपूर : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तिसऱ्या अनौपचारिक सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा अपयशी ठरले आहेत. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या प्रभसिमरन सिह यानं तुफानी शतक केलं आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 316 धावा केल्या. भारताला विजयासाठी 317 धावांची गरज आहे. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर प्रभसिमरन सिंह यानं 68 बॉलमध्ये 102 धावांची खेळी केली यामुळं भारत भक्कम स्थितीत पोहोचला. भारतानं हा सामना 2 विकेटनं जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघानं सुरुवातीला 135 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र, कॅप्टन जॅक एडवर्डस आणि लियाम स्कॉटनं 152 धावांची भागीदारी केली. एडवर्डसनं 89 आणि स्कॉटनं 73 धावा केल्या. यामुळं ऑस्ट्रेलियानं 316 धावांपर्यंत मजल मारली.
अभिषेक शर्मा, तिलक वर्मा अपयशी
अभिषेक शर्मा दुसऱ्या वनडे मध्ये शुन्यावर बाद झाला होता. तिसऱ्या मॅचमध्ये तो केवळ 22 धावा करु शकला. तिलक वर्मानं दुसऱ्या वनडेमध्ये 94 धावा केल्या होत्या. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात तो 3 धावा करुन बाद झाला. प्रभसिमरन सिंहनं एकाबाजूनं आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. त्यानं 68 बॉलमध्ये 102 धावा केल्या. या खेळीत त्यानं 8 चौकार आणि 7 षटकार मारले. प्रभसिमरन सिंह यानं 150 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या.
या मालिकेत शतक करणारा प्रभसिमरन भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. पहिल्या वनडेत श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्यनं शतक केलं होतं. प्रभसिमरन सिंह यानं आज शतक केलं आहे. आयपीएलमध्ये तो पंजाबकडून खेळतो. पहिल्या वनडेत त्यानं 56 धावा केल्या होत्या. दुसऱ्या वनडेत 1 रन तर तिसऱ्या वनडेत 102 धावा केल्या. म्हणजेच त्यानं या मालिकेत 159 धावा केल्या आहेत.
भारताचा मालिका विजय
भारत अ संघानं ऑस्ट्रेलिया अ विरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. प्रभसिमरन सिंह याच्या शतकाशिवाय भारताचा कॅप्टन श्रेयस अय्यरच्या 62 धावा, रियान परागच्या 62 धावा त्यानंतर त्यानंतर आयुष बदोनी आणि विपराज निगमनं केलेल्या फलंदाजीमुळं भारतानं 2 विकेटनं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत मालिका जिंकली.
आणखी वाचा
Comments are closed.