Asia Cup: अभिषेक शर्माची तुफानी कामगिरी! आशिया कपमध्ये रचला इतिहास
टीम इंडियाचा सलामी फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही जबरदस्त फलंदाजी केली आहे. अभिषेकसमोर प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाजी हल्ला पूर्णपणे फिका पडला आहे. 25 वर्षीय अभिषेकने दुबईच्या मैदानावर आपल्या या खेळीत इतिहास रचला आहे. तो टी-20 आशिया कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
या बाबतीत त्याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिजवानलाही मागे टाकले आहे. डावखुऱ्या अभिषेकने तुफानी फलंदाजी करत केवळ 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. या स्पर्धेत अभिषेकची कामगिरी जबरदस्त असून चौकार-षटकारांची आतषबाजी त्याने केली आहे.
अभिषेक आता टी-20 आशिया कपच्या एका हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने मोहम्मद रिजवानचा विक्रम मोडीत काढला आहे. रिजवानने 2022 मध्ये 6 डावांत एकूण 281 धावा केल्या होत्या. मात्र, अभिषेक आता त्यापेक्षा पुढे गेला आहे. तो टी-20 आशिया कपमध्ये 300 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्ध टॉस हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी सुरू केली. पण सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल (Shubman gill) फक्त 4 धावा करून महिष तीक्षणाच्या (Mahish Tikshana) चेंडूवर बाद झाला. मात्र याचा अभिषेकवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने एका टोकाला जबरदस्त फटकेबाजी करत खेळ सुरू ठेवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर तो अजिबात दबावात दिसला नाही आणि फक्त 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला. त्याने 13 चेंडूत फक्त 12 धावा केल्या आणि बाद झाला.
Comments are closed.