अभिषेक पोरेलचा पाय आणखी खोलात; कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अभिषेक पोरेलच्या अडचमींमध्ये वाढ झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे आणि त्याचे रिकॉर्डींग केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. एका मेडिकलच्या विद्यार्थीनीने केलल्या तक्रारीनंतर त्याला 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जामीनासाठी त्याने कोर्टात याचीका दाखल केली असता चिनसुराह कोर्टाने त्याची जामीन याचीका फेटाळून लावत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलचे शिक्षण घेणारी तरुणी आणि अभिषेक पोरेल मागील 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेक वर्ष एकत्र असल्यामुळे त्यांनी लग्नाचा विचारही केला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पण त्यावेळी कोणतीही FIR दाखल झाली नव्हती. मात्र, त्यानंतर तरुणीने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना तातडीने अभिषेक पोरेलला अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हुगळी जिल्ह्यातील मोगरा पोलिसांनी त्याला अटक केली. आता कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

अभिषेक पोरेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून त्याने आतापर्यंत 35 सामन्यांमध्ये 769 धावा केल्या आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे तो प्रतिनिधीत्व करतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 32 सामने खेळले असून 50 डावांमध्ये 1408 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

Comments are closed.