Abu azmi reaction on being suspended from maharashtra assembly over aurangzeb remarks in marathi
औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबन करण्यात आले आहे. हा निर्णय आपल्याला मान्य नसून आझमी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Abu Azmi Suspension : मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबन करण्यात आले आहे. हा निर्णय आपल्याला मान्य नसून आझमी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मी अधिवेशनात असं काहीही बोललेलो नाही, ज्यामुळे मला निलंबित केले जाईल, अशा शब्दात आझमी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आझमी यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ होताच आझमी यांनी मंगळवारीच आपण आपले वक्तव्या मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. (abu azmi reaction on being suspended from maharashtra assembly over aurangzeb remarks)
या निर्णयाला आपण न्यायालयात आव्हान देणार असल्याचे मानखुर्द – शिवाजीनगरचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले. मला असे कसे हटवले जाऊ शकते. सध्या रमझानचा महिना सुरू आहे. माझे रोजे असतात. सध्या माझी तब्येत बरी नाही. त्यामुळे लवकरच मी याबाबतीत कायदेशीर सल्ला घेणार आहे. अनेकजण शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही न काहीतरी बोलत असतात, मात्र त्यांच्यावर काहीही कारवाई होत नसल्याची खंतही त्यांनी वक्यक्त केली.
हेही वाचा – Actress Ranya Rao Arrested : सोने तस्करी प्रकरणी अभिनेत्रीला अटक, निघाली IPS अधिकाऱ्याची मुलगी
अबू आझमी यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. विधानसभेत मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. बाहेरही मी कोणत्याही महापुरुषाबद्दल काहीही चुकीचे बोललेलो नाही. मग मला का निलंबित करण्यात आले, असा सवाल त्यांनी विचारला आहे. विधान भवनाच्या आवारात मी औरंगजेबाबद्दल तेच म्हटले आहे, जे इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. याशिवाय मी काहीच म्हटलेले नाही. तरीही मला निलंबित करणे, मला फार लागले आहे. हा अन्याय आहे, असेही आझमी म्हणाले.
या व्हिडीओत आझमी पुढे म्हणतात, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. त्यांच्यासाठी काय काय शब्द वापरले. मी तर तसं वागू-बोलू शकत नाही. मात्र, त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. इथे कायदा आहे की नाही?
हेही वाचा – Abu Azmi : औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले, अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी विधान सभेतून निलंबित
अबू आझमी म्हणतात, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी माझ्या मतदार संघातील लोकांच्या समस्या, प्रश्न मांडणार होतो. याव्यतिरिक्तही अनेक मुद्दे होते. मात्र, माझ्या निलंबनामुळे हे सगळं आता संपलं आहे. मला का निलंबित केले, हे मी अध्यक्षांना विचारणार आहे. हे कोणत्या कायद्यात मोडते, असेही त्यांनी विचारले आहे.
Comments are closed.