उद्या मुस्लिमांच्या अंगावर रंग पडला तर…, अबू आझमींचं हिंदू-मुस्लिमांना भावनिक आवाहन
अबू आझमी: होळी उत्साहाने साजरी करा मात्र, मुस्लिमांवर संमतीशिवाय रंग टाकू नका, मुस्लिम बांधवांनाही मी विनंती करेन की जर उद्या मुस्लिमांच्या अंगावर रंग पडला तर भांडणात उतरू नका. हा क्षमा आणि बंधूत्व साजरे करण्याचा महिना आहे. असेही अबू आझमी म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तम प्रशासक म्हणत औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याचे राजकारण तापले होते. दरम्यान, धुळवडीदिवशीच रमजान आल्याने होळीपूर्वी मशिदी मेनकापडाने झाकल्या जात आहेत. यावरून सपाचे आमदार यांनी हिंदू मुस्लिमांना भावनिक आवाहन केलंय. (Abu Azmi)
दरम्यान, उत्तरप्रदेशातील जामा मशीद स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार होळीआधी मशिदींना मेनकापडाने झाकण्यात येत आहेत कारण काही लोक कोणी रंग टाकला तर जातीय भडका उठू नये यासाठी मशीदी झाकल्या जातायत. प्रत्येकाला आपला धर्म जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. सणांचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मिळून उत्सव साजरा करावा असेही अबू आझमी म्हणाले.
काय म्हणाले अबू आझमी?
आपल्या देशात गंगा जमुना परंपरा आहे. तरीही काही लोक गैरकृत्य करतील. आपल्याला उत्सवांचे राजकारण करण्याची गरज नाही. उद्या होळी साजरी करणाऱ्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी उत्साहाने होळी साजरी करावी पण कोणत्याही मुस्लिम बांधवांवर संमतीशिवाय रंग टाकू नये. नाईलाजाने घरात नमाज अदा करता येऊ शकतो. मात्र रमजान चा नमाज मशिदीत अदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी मशिदीत जाऊन नमाज पडावा. जर अंगावर रंग पडला तरी भांडणात उतरू नये. भांडण तंटे न करता रहावे. हा महिना बंधुत्वाचा आणि क्षमा करण्याचा महिना आहे. जरी एखादा रंग पडला तरी तंटे करू नका. अशी विनंती आहे असे अबू आझमी म्हणाले.काही लोक मुद्दाम मशिदीवर रंग टाकतील त्यामुळे भांडणे होऊ नये त्यासाठी मशिदी झाकल्या जात असतील असेही ते म्हणाले .
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.