अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय विचाराधीन, सरकारची न्यायालयात माहिती

1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेम याने गेल्या 25 वर्षांत देशात अनेक गुन्हे केले. तुरुंगातील शिक्षेची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही, पण त्याच्या मुदतपूर्व सुटकेची मागणी विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रतिज्ञापत्रावर राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली.
गँगस्टर अबू सालेम याला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तळोजा येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सालेमने माफी व मुदतपूर्व सुटकेसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुहास वरके यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात त्यांनी नमूद केले आहे की, सालेमवर दहशतवादाशिवाय हत्या, हत्येचा कट रचणे, खंडणी अशा गंभीर गुह्यांची नोंद असून ते माफी योग्य नाहीत. याशिवाय 1993 च्या बॉम्बस्पह्टानंतर तो परदेशात पळून गेला होता. खंडपीठाने प्रतिज्ञापत्र दाखल करून घेत सुनावणी जून महिन्यापर्यंत तहकूब केली.
Comments are closed.