लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घरी मोठं घबाड; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश;अधिकीरी चक्रावले
पालघर : लाचलुचपत विभागाने (ACB) मंगळवारी एका वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात पकडल्यानंतर आता त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. वसई तालुक्यातील ससूनवघर गावातील सात गुंठे जमिनीच्या प्रकरणात २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. रात्री वनपरिक्षेञ अधिकारी संदीप चौरे याच्या घराची झडती घेतली असता, लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी 57 तोळे सोने आणि तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे.
सन 2005 मध्ये वनविभागाने ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या सात गुंठे जमिनीचा ताबा परत मिळवून देण्यासाठी आणि वरिष्ठ कार्यालयात अनुकूल अहवाल देण्यासाठी परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांनी 20 लाखांची लाच मागितली होती. याप्रकरणी चौकशीदरम्यान, चौरे यांनी आरोपी चंद्रकांत पाटील आणि अन्य एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितल्याचे उघड झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील याला, मंगळवारी दहा लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते. यावेळी चौकशीदरम्यान चौरे यांचा मुख्य सहभाग समोर आला होता. त्यामुळे चौरे, पाटील आणि एका अनोळखी इसमाविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत कायदा सन 2018 चे कलम 7 आणि 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यात लाचलुचपत विभागाने अद्याप एकालाही अटक केली नाही.
57 तोळं सोनं, 1.31 कोटींची रोकड
दरम्यान, लाचलुचपत विभागाने संदीप चौरे यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता, 57 तोळे सोने आणि तब्बल 1 कोटी 31 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या जप्तीमुळे चौरे यांच्या मालमत्तेचा तपशील अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पालघर लाचलुचपत विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चौरे आणि अन्य आरोपींच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग लक्षात घेता, वसई विरार मधील अधीकतर वन क्षेञ हे चाळ माफियांच्या घशात कशा प्रकारे गेले असतील हे समोर आलं आहे. चार वर्षापूर्वी ही वसईच्या रेंज ऑफीस कार्यालयात अधिकारी दिलीप तोंडे यांना ही 10 लाखाची लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.