मोहसिन नक्वीचं स्थान धोक्यात? पाकिस्तानाकडून जोरदार दबाव! जाणून घ्या सविस्तर
आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025) पाकिस्तानचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब राहिले. पाकिस्तानने भारताविरुद्ध 3 सामने गमावले. फायनलमध्येही पाकिस्तान क्रिकेट संघाला टीम इंडियासमोर पराभव पत्करावा लागला. भारताने पाकिस्तानला 5 विकेटने हरवून आशिया कपचा 9वा किताब आपल्या नावावर केला.
आता आशिया कप फायनलमध्ये पराभवानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे आणि मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. पाकिस्तान तहरीक ए इंसाफचे वरिष्ठ नेते मूनिस इलाही यांनी मोहसिन नक्वी यांना पीसीबी चेअरमन पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोहसिन नक्वीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर मोहसिन नक्वीविरुद्ध कारवाईची मागणी करत म्हटले की, जर पंतप्रधान शहबाज शरीफमध्ये थोडीशीही हिंमत असेल तर मोहसिन नक्वी यांना बर्खास्त केले पाहिजे.
Comments are closed.