आशिया कपची ट्रॉफी एसीसीच्या ताब्यात, एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वींचा सूर नरमला

आशिया कपच्या अंतिम फेरीनंतर हिंदुस्थानी संघाने मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा नक्वींनी ती ट्रॉफी स्वतःकडेच ठेवण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे स्पर्धा जिंकल्यानंतर सुरू झालेले ट्रॉफी युद्ध मैदानाबाहेर पेटले. बीसीसीआयने नक्वींची तक्रार आयसीसीकडे करण्याचा इशारा देताच नक्वींचा सूर नरमला असून आता त्यांनी ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयात जमा केली आहे. हिंदुस्थानी संघाने झाले गेले विसरून ट्रॉफी घेण्यासाठी दुबईस्थित एसीसीच्या कार्यालयात यावे. आम्ही तुमचे स्वागत करू आणि ती ट्रॉफी तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ट्रॉफी वाद आणखी काही काळ पेटणार, हे निश्चित झाले आहे.

मंगळवारी एसीसीची वार्षिक बैठक झाला होती. या बैठकीत बीसीसीआयने नक्वी यांना धारेवर धरले आणि ट्रॉफी परत करण्यास सांगितले होते. याबाबत आयसीसीकडे तक्रार करण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, नक्वी यांना या सगळ्या प्रकारानंतर एसीसी प्रमुखपदावरून काढून टाकले जाऊ शकते, अशा बातम्याही आल्या. या पार्श्वभूमीवर नक्वी यांनी ट्रॉफी एसीसी कार्यालयात जमा केली आहे. आता हिंदुस्थानी संघ ही ट्रॉफी कशा पद्धतीने स्वीकारणार, याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

बीसीसीआयची क्षमा मागणार नाही

नक्वी यांनी बीसीसीआयकडे माफी मागितल्याची चर्चा आहे. हे वृत्त नक्वी यांनी फेटाळले. आपण ना बीसीसीआयजवळ माफी मागितलीय, ना कधीही माफी मागणार असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे या
ट्रॉफी युद्धाचा भडका अजून काही काळ धगधगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत..

Comments are closed.