Accident at Palghar Railway Station western railway three people died on the spot one injured urk


पालघर – पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. पालघरच्य हनुमान मंदिर चौक येथील बंद रेल्वे फाटकाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना स्थळी रेल्वे पोलीस हजर झाले आहेत. अपघात नेमका कसा घडला हे अद्यापही समोर आलेले नाही. मात्र रेल्वेने उडवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताचे कारण अजून समोर आलेले नाही. अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र तीन जणांचा या ठिकाणी मृ्त्यू झाल्यामुळे पालघर रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. जखमीला पालघर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र अपघात नेमका कसा आणि केव्हा घडला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. पोलीस चौकशीतच नेमके काय घडले ते समोर येण्याची शक्यता आहे.

– Advertisement –

असा झाला अपघात.. 

बोईसर पूर्वेला एका कारखान्यात वेल्डिंग आणि इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यातील तीन तरुण गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते. पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना मुंबईहून जयपुरकडे जाणारी जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी आल्याने दोन रुळाच्या मध्ये असणाऱ्या जागेत तिघांपैकी दोघे थांबून राहिले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात सोनू राम (35), मोनू कुमार (19) यांचा जागेवरच मृ्त्यू झाला तर अनुप पंडित (20) जखमी आहे.

हेही वाचा : Ulhasnagar : उल्हासनगर शासकीय रुग्णालयात तीन तास बत्ती गुल; शस्त्रक्रिया, प्रसुती रखडल्या, आयसीयूमध्ये…

– Advertisement –

Edited by – Unmesh Khandale



Source link

Comments are closed.