चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटजवळ दुर्घटना; 100 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळून एक महिला गंभीर जखमी

चंद्रपूर शहरातील जटपूरा गेटजवळ 100 वर्ष जुनी जीर्ण अवस्थेत असलेल्या उत्तम लॉजच्या इमारतीचा एक भाग दुध विक्रेत्या महिलेवर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मनीषा लोखंडे (४५) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला रोज उत्तम लॉज खाली बसून दूध विकण्याचे काम करते. घटनेनंतर जखमी महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या इमारतीला महानगपालिके कडून दोन वर्ष आधीच पाडण्याचे नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments are closed.