उष्णतेने हैराण झाले! घराबाहेर झोपले अन् काळाने घात केला, भरधाव वेगात आलेल्या कारनं कुटुंबातील 7
अपघात बातम्या: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात भरधाव गाडीने एकाच कुटुंबातील सात जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे कुंटूब रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. या अपघातात आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार वर्षांच्या मुलासह पाच जणांवर उपचार सुरू आहेत. काल (शुक्रवारी) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बालापार-टिकरिया रोडवरील रघुनाथपूर भगवानपूर गावाजवळ ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाच कुटुंबातील सात सदस्यांना चिरडलं. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, उपचार सुरू असताना आई आणि मुलीचा मृत्यू झाला. चार वर्षांच्या मुलासह पाच जणांवर उद्याप उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नागरिकांनी भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या एका तरुणाला पकडलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, लोकांना समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी क्रेन बोलावली आणि गाडी तेथून पोलिस ठाण्यात नेण्यात आली.
पोलिसांनी अपघाता प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथपूर भगवानपूर गावात बालापार-टिकरिया रोडच्या बाजूला सईदा खातून यांचे घर आहे. उष्णतेमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर रस्त्याच्या कडेला खाटांवर झोपले होते. रात्री 10.30 वाजता एक वेगवान कार मंगळस्थानहून बाळापारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाची पार्टी गाडीत होत होती. गाडी इतक्या वेगाने जात होती की ती नियंत्रणाबाहेर गेली आणि डाव्या बाजूला रस्त्यावरून खाली घसरली. यादरम्यान, घरासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या खाटेवर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना कारने चिरडलं. कारने चिरडल्याने सईदा खातून (30) आणि त्यांची मुलगी सुफिया (16) यांच्यासह कुटुंबातील सदस्य बद्रे आलम (17), राबिया (32), मरियम (50), जुबैर (14) आणि निहाल (04) जखमी झाले. त्या सर्वांना बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, मात्र, उपचारांदरम्यान सईदा खातून आणि मुलगी सुफिया यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संतप्त लोकांनी गाडी ताब्यात घेतली. गाडीतील चार जण पळून जाऊ लागले. पण, लोकांनी त्यापैकी एकाला पकडले, आणि त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. लोकांचा रोष पाहून गुलरीहा आणि चिलुआताल पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजावून गाडी ताब्यात घेतली. एसपी सिटी अभिनव त्यागी म्हणाले की, अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जखमींवर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.