कळवा उड्डाणपुलावर अपघात; रिक्षाला कारची धडक, दोघे जखमी
कळवा उड्डाणपुलावर आज पहाटे कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की यात रिक्षाचालक आणि प्रवासी असे दोनजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यावर ऑ इल सांडले. मात्र आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
कळवा येथील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर पहाटे 5.42 वाजता कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक गोविंद पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच रिक्षामधील प्रवासी प्रथमेश चव्हाण हेदेखील जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खारेगाव पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Comments are closed.