IPL 2025; आयपीएलचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?
आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. पण सर्वांनाच उत्सुकता असेल आयपीएल 2025च्या वेळापत्रकाची. तत्पूर्वी आयपीएलचे वेळापत्रक काही दिवसात जाहीर होणार होते, परंतु वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. स्पोर्ट्स तकच्या रिपोर्टनुसार, आयपीएल प्रशासकीय संस्था पुढील आठवड्यापर्यंत वेळापत्रक जाहीर करेल.
यापूर्वी असे रिपोर्ट आले होते की, आयपीएलचे वेळापत्रक या आठवड्यात होईल.परंतु, आता चाहत्यांना आगामी आवृत्तीचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. एका मोठ्या घडामोडीमध्ये, स्पोर्ट्स तकने असेही उघड केले आहे की, आयपीएलच्या 2 फ्रँचायझी, प्रामुख्याने दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR), त्यांचे 2 होम गेम घराबाहेर खेळतील. विशेष म्हणजे, (DC) त्यांचे 2 होम गेम विजागमध्ये खेळेल, तर (RR)चे स्थळ अद्याप जाहीर केलेले नाहीत.
शेवटच्या हंगामातही, दिल्लीला त्यांचे काही सामने विजागमध्ये खेळावे लागले कारण आयपीएल 2024 सुरू होण्याच्या जवळ WPLचा हंगाम संपला होता आणि अरुण जेटली स्टेडियम आयपीएल सामने आयोजित करण्यास तयार नव्हते कारण दर्जेदार मैदान तयार करावे लागले होते. राजस्थान बहुधा गुवाहाटीमध्ये त्यांचे होम सामने खेळेल, जिथे ते यापूर्वी खेळले आहेत.
आगामी आयपीएल हंगामाची सुरूवात (21 मार्च) पासून होणार आहे. या लीगचा फायनल सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होण्याची शक्यता आहे.
🚨 आयपीएल 2025 वेळापत्रक. 🚨
– पुढील आठवड्यात घोषित करण्यासाठी आयपीएल वेळापत्रक निश्चित केले जाईल. (स्पोर्ट्स टॅक) pic.twitter.com/59gouz0qde
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 10 फेब्रुवारी, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy: जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आज होणार अंतिम निर्णय!
फॅब-4 आणि शतक: विराट, स्मिथ, रूट यांच्या प्रतीक्षेची कहाणी
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी जसप्रीत बुमराहच्या सहभागावर अनिश्चितता, अंतिम निर्णय लवकरच
Comments are closed.