अहिल्यानगरमध्ये घरात घुसून विवाहितेवर बलात्कार; आरोपीला अटक

घरात घुसून 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर कुठेही घडल्या प्रकाराची वाच्छता केल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. राहुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे पती रात्रपाळीला गेल्यामुळे ती घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने रात्री उशिरा तिच्या घराचे दार ठोठावून जबरदस्तीने आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर अत्याचार केला आणि घटना कुणालाही सांगितल्यास जीवघेणी धमकी दिली.

सकाळी पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव आणि पथकाने तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.

Comments are closed.