पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
पिंपरी-चिंचवड: नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात कठोर कारवाई केली आहे. पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण 40 गणेश मंडळांवर ‘भारतीय न्याय संहिता कलम 223’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या (Pimpri Chinchwad Police) हद्दीत करण्यात आली आहे, यात प्रामुख्याने
* वाकड: १७ मंडळे
* पिंपरी: ८ मंडळे
* निगडी: ५ मंडळे
* सांगवी: ५ मंडळे
* दापोडी: ३ मंडळे
* तळेगाव दाभाडे: २ मंडळे
या मंडळांनी लेझर बीम लाईटचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला होता, ज्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.ध्वनी प्रदूषणावरही लक्ष गणेशोत्सवादरम्यान शहरात ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांनी ‘नॉईज लेव्हल मीटर’ या उपकरणाचा वापर केला. आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी ध्वनीच्या पातळीची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ज्या मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडले आहेत, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू आहे.शांतता आणि सुरक्षिततेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, पोलिसांनी सणासुदीच्या काळातही नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून दिले आहे.
गणेशोत्सवात नियमभंगाला चाप देत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ४० गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई ‘भारतीय न्याय संहिता कलम २२३’ अंतर्गत करण्यात आली असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.