अमृता फडणवीस म्हणाल्या… खरातवर आधीच कारवाई व्हायला हवी होती
भोंदूबाबा खरातवर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. तसे झाले असते तर बऱयाच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक पीडित महिला उद्ध्वस्त होण्यापासून वाचल्या असत्या, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मांडले.
अशोक खरात प्रकरण खूपच भयानक आहे. त्यातून बऱयाच गोष्टी बाहेर येणार आहेत. कोणत्याही बाबावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. अशा बुवाबाजीवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
Comments are closed.