श्रीसंतला कानशिलात मारल्यानंतर हरभजन सिंगवर बीसीसीआयने काय कारवाई केली? वाचा सविस्तर

हरभजनसिंग श्रीशांत स्लॅपगेट: 18 वर्षे उलटून गेली होती, हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात मारलेला व्हिडिओ अजूनही एक रहस्यच होता. 2008 मध्ये घडलेल्या त्या घटनेचा व्हिडिओ 2025 मध्ये आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी जारी केला. (Lalit Modi releases slap video) हा व्हिडिओ समोर येताच क्रिकेट जगतात खळबळ उडाली. थप्पड मारल्यानंतर श्रीसंत रडत असल्याचे फोटो वर्षानुवर्षे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आता ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर, 18 वर्षांपूर्वी बीसीसीआयने हरभजन सिंगला काय शिक्षा दिली होती, ते या बातमीद्वारे आपण जाणून घेऊयात. (BCCI action on Harbhajan Singh)

आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंग मुंबई इंडियन्सकडून आणि श्रीसंत किंग्ज XI पंजाबकडून (आता पंजाब किंग्ज) खेळत होता. कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर पंजाबच्या संघाने सामनाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या सामन्याचे सामनाधिकारी फारुख इंजिनियर होते, ज्यांनी तपासणीनंतर हरभजनला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार लेव्हल 4.2 चा दोषी ठरवले.

हरभजन सिंगला शिक्षा म्हणून आयपीएल 2008 च्या उर्वरित सामन्यांमधून निलंबित करण्यात आले होते. (Harbhajan Singh punishment IPL) दुसरी शिक्षा म्हणजे त्याला 2008 च्या हंगामासाठी कोणतेही वेतन देण्यात आले नाही. परिणामी, हरभजन आयपीएल 2008 मध्ये फक्त 3 सामने खेळू शकला. नंतर हरभजनने आपली चूक मान्य केली आणि त्याने श्रीसंतची माफीही मागितली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील या प्रकरणात खूप कठोर भूमिका घेतली होती. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने हरभजन सिंगला नियम 3.2.1 नुसार दोषी ठरवले. त्याच्यावर 5 वनडे सामन्यांची बंदी घालण्यात आली. तसेच, त्याला भविष्यात अशी कोणतीही चूक केल्यास आजीवन बंदी घातली जाईल असा इशाराही देण्यात आला होता. (BCCI action on Harbhajan Singh)

Comments are closed.