मध्य रेल्वेवर 12.86 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई; 101 कोटींचा दंड वसूल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फाईळ फोटो

रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून किमान 250 रुपयांवरून 500 रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. तथापि, त्या निर्णयाचा फुकट्या प्रवाशांवर विशेष परिणाम झाला नसल्याचेच चित्र आहे. मध्य रेल्वे मार्गावर मागील तीन महिन्यांत तब्बल 12.86 लाख विनातिकिट आणि अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले. या प्रवाशांकडून 101 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह मुख्यालय व उर्वरित विभागांच्या कार्यक्षेत्रात विविध समर्पित तिकीट तपासणी पथकांमार्फत कारवाईच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. या मोहिमांतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तिकीटाशिवाय तसेच अवैध प्रवास परवानगीसह प्रवास करणाऱ्या 12.86 लाख प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून 101.21 कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी या कारवाईची माहिती दिली.

मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कारवाईच्या तुलनेत यंदा फुकट्यांच्या संख्येत तसेच दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 11.34 लाख विनातिकीट आणि अवैध प्रवाशांकडून 70.72 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा फुकट्यांच्या संख्येत सुमारे 14 टक्के, तर दंडाच्या रकमेत 43 टक्क्यांची वाढ झाली.

Comments are closed.