विकसित भारतासाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

वृत्तसंस्था/ कोची

भारताला 2047 पर्यत विकसित राष्ट्र करण्याच्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी महिलांची सक्रीय भागीदारी अत्यंत आवश्यक आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका पार पाडू लागल्यावरच देश स्वत:च्या लोकसंख्यात्मक शक्तीचा पूर्ण लाभ घेऊ शकणार आहे. महिलांच्या नेतृत्वातील समाज अधिक संवेदनशील असण्यासोबत अधिक दक्षही सिद्ध होणार असल्याचे उद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोची येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करताना काढले आहेत. अनेक सामाजिक आणि आर्थिक वर्गांमधील महिला आता भारताच्या प्रगतीच्या प्रेरकशक्ती ठरल्या आहेत. केरळचे लिंग गुणोत्तर प्रमाण देशात सर्वात चांगले आहे. केरळचे अनुकरण अन्य राज्ये करू शकतात. युवतींनी स्वत:च्या जीवनात निर्णय साहस आणि स्पष्टतेसह घ्यावेत आणि स्वत:चा ध्यास आणि क्षमतेला अभिव्यक्त करणारे मार्ग निवडावेत. महिलेच्या नेतृत्वातील समाज अधिक मानवीय आणि प्रभावी असतो. कॉलेजमधील सर्व विद्यार्थिनी स्वत:च्या कार्यक्षेत्रांमध्ये महिला-नेतृत्वातील विकासाची शक्ती प्रदर्शित करतील, अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 

Comments are closed.