अभिनेता अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात

अभिनेता अक्षर कोठारी लग्नबंधनात अडकला आहे. अक्षरने बालपणीची मैत्रीण सारिका खासनिस हिच्याशी लग्न लग्नगाठ बांधली आहे. त्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना ‘तेव्हा, आता आणि नेहमी’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कलाकारांनी आणि इंडस्ट्रीतील अनेक मंडळींनी अक्षरला त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed.