संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनची तीन तासाहून अधिक चौकशी
हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनची मंगळवारी तीन तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. दुपारी 2.45 पर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान पोलिसांनी अभिनेत्याला अनेक प्रश्न विचारले. सेंट्रल झोनचे डीसीपी अक्षांश यादव यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने अभिनेत्याची चौकशी केली.
चौकशीदरम्यान पोलिसांनी अभिनेत्याला महिलेच्या मृत्यूची माहिती होती का विचारले. यावर अभिनेत्याने आपल्या दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले असे सांगितले. चिक्कडपल्ली पोलिसांनी सोमवारी अल्लू अर्जुनला नोटीस बजावली होती. संध्या थिएटर चेंगराचेंगराप्रकरणी मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश नोटीशीत देण्यात आले होते.
चार तासांच्या चौकशीनंतर अल्लू अर्जुन घरी परतला. अर्जुनचा बाऊन्सर अँथनीवर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अभिनेत्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. तसेच आवश्यकता भासल्यास अभिनेत्याला संध्या शिएटरला नेऊन सीन रिक्रिएशन करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘या’ प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत पोलीस
व्यवस्थापनाने तुम्हाला संध्या थिएटरमध्ये येऊ नका असे आधीच सांगितले होते का? तुम्हाला माहीत आहे का पोलिसांची परवानगी नव्हती? तुम्हाला माहीत नव्हते का? संध्या थिएटरमधील प्रीमियर शोला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही परवानगी घेतली होती का? तुमच्याकडे त्याची प्रत आहे का? तुम्ही किंवा तुमच्या पीआर टीमने पोलिसांची परवानगी घेतली होती का? तुमच्या पीआर टीमने तुम्हाला संध्या थिएटरजवळील परिस्थितीबद्दल आधीच माहिती दिली होती का? तुम्ही किती बाऊन्सर्सची व्यवस्था केली?
Comments are closed.