मुलगी झाली हो! खान कुटुंबात पाळणा हलला, सलमान काका झाला; अरबाज-शूराला कन्यारत्न

अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा बाबा बनला आहे. अरबाज आणि पत्नी शूराला कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शूरा शनिवारी सकाळी प्रसूतीसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाली होती. तिने आज बाळाला जन्म दिला. अरबाज आणि शूराने 2023 साली लग्न केले. अरबाजचे हे दुसरे लग्न असून लग्नाच्या दोन वर्षानंतर आता एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत. सध्या खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अरबाज खानचा मुलगा अरहान त्याच्या धाकट्या बहिणीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला आहे. त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल होत आहे. अरहानसोबतच अरबाजचा धाकटा भाऊ सोहेल खानही रुग्णालयात दिसला.
Comments are closed.