जयदीपने खरेदी केला 10 कोटींचा फ्लॅट

बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावत आणि त्याची पत्नी ज्योती हुड्डाने मुंबईतील अंधेरीत 10 कोटी रुपये किमतीचा आणखी एक फ्लॅट खरेदी केलाय. अवघ्या दोन महिन्यांत दोन फ्लॅट खरेदी केलेत. याआधी याच प्रोजेक्टमध्ये 10 कोटींचा एक फ्लॅट खरेदी केला होता. जयदीपने मे 2025 मध्ये पूर्णा अपार्टमेंट्स नावाच्या प्रोजेक्टमध्ये पहिला फ्लॅट खरेदी केला. आता जून 2025 मध्ये दुसरा फ्लॅट त्याच प्रोजेक्टमध्ये खरेदी केला आहे. दोन्ही फ्लॅट वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. नव्या फ्लॅटचा कार्पेट एरिया 1950 फूट आहे.

Comments are closed.