हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता पीटर ग्रीन यांचे निधन

द मास्क आणि पल्क फिक्शन या सिनेमांतील भूमिकेंसाठी प्रसिद्ध असलेला हॉलीवूडचा दिग्गज अभिनेता पीटर ग्रीन याचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांचे मॅनेजर ग्रेग एडवर्ड्स यांनी शुक्रवारी अभिनेते त्यांच्या न्यू यॉर्क शहरातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळल्याची पुष्टी केली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
“द युझुअल सस्पेक्ट्स” आणि “ट्रेनिंग डे” सारख्या सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयासाठी देखील ते ओळखले जात होते. हॉलिवूडने एक प्रतिभावान पात्र अभिनेता गमावला आहे. . दोन वर्षांनंतर, त्यांनी “लॉज ऑफ ग्रॅव्हिटी” या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. न्यू जर्सीमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या, ज्यात क्लीन शेव्हन (1993) यांचा समावेश होता. पीटर ग्रीन हे टेलिव्हिजनमध्येही सक्रिय होते. ग्रीन यांच्या पश्चात एक बहीण आणि एक भाऊ आहे.

Comments are closed.