अभिनेते प्रेम चोप्रा यांना डिस्चार्ज, लीलावती रुग्णालयात ८ दिवस सुरु होते उपचार

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांना शनिवार रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते ८ नोव्हेंबरपासून रुग्णालयात दाखल होते. छातीत जळजळ आणि इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची तब्येत सुधारली असून, ते घरी परतले आहेत.

अभिनेते विकास भल्ला यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले की, ते आता घरी परत आले असून, पूर्णपणे निरोगी आहेत. रुग्णालयात दाखल होण्याची प्रक्रिया फक्त सावधगिरीसाठी होती. त्यांची स्थिती कधीच गंभीर नव्हती आणि आता त्यांना बरे वाटत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही आरोग्याशी संबंधित समस्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Comments are closed.