अभिनेता राजपाल यादवला न्यायालयाचा दिलासा, 1 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव हा एका चेक बाऊन्स प्रकरणात अडकला आहे. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईत अडकलेल्या राजपाल यादवला 1 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने प्रकरणाचे गांभीर्य आणि आतापर्यंत जमा झालेली रक्कम लक्षात घेऊन हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, जर राजपाल यादव यांनी थकीत रक्कम भरली, तर प्रकरणाचा निकाल येथेच लागेल अन्यथा, न्यायालय पुढील तारखेला आपला अंतिम निर्णय देईल.
सुनावणीदरम्यान, राजपाल यादव यांच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, त्यांनी नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. अंतरिम जामीन आज संपत असल्याने हा दिलासा मागण्यात आला होता. वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला 4.25 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, २५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) आज न्यायालयात सादर करण्यात येत होता. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि सांगितले की, मोठी रक्कम आधीच भरण्यात आल्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार नाही.
न्यायालयाचा अंतिम इशारा आणि पुढील सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयाने आता या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयाने राजपाल यादव यांना सांगितले की, ही त्यांची शेवटची संधी आहे. जर त्यांनी थकीत रक्कम परत केली तर, प्रकरण बंद केले जाईल; अन्यथा, कायदेशीर युक्तिवादांच्या आधारे निर्णय दिला जाईल. न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की पुढील सुनावणी 1 एप्रिल कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही आणि संपूर्ण प्रकरण त्याच दिवशी निकाली काढले जाईल.
Comments are closed.