अल्पवयीन मुलीचा पाठलाग आणि छळ प्रकरण, ‘सैराब’ फेम अभिनेता रोहित चंदेलला पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग आणि छळ केल्याप्रकरणी ‘सैराब’ फेम टीव्ही अभिनेता रोहित चंदेल याला पोलिसांनी अटक केली आहे. रोहितला दहिसर येथील राहत्या घरातून पंत नगर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. रोहितला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहितवर विशेष POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हा अभिनेता काही काळापासून पीडित अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या फोन नंबरवरून वारंवार फोन करून त्रास देत होता; ते दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. तसेच
5 जुलै रोजी रोहित चंदेलने पीडितेचा तिच्या हाऊसिंग सोसायटीजवळ पाठलाग करत तिला बळजबरीने थांबवले.यानंतर रोहितने पीडितेला शिवीगाळ केली. तिने विरोध केला असता तिला मारहाण केली.

मुंबई पोलिसांनी आरोपी अभिनेत्याविरुद्ध पोक्सो कायदा, तसेच भारतीय दंड संहितेच्या (IPC) अंतर्गत पाठलाग करणे आणि स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे या कलमांवखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

रोहित चंदेल हा टेलिव्हिजन आणि वेब सिरीजमधील एक परिचित चेहरा आहे. ‘पांड्या स्टोअर’ (Pandya Store), ‘सैराब’ (Sairaab) आणि ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ (Kashibai Bajirao Ballal) यांसारख्या प्रोजेक्ट्ससाठी तो ओळखला जातो. त्याने ‘हर मुश्किल का हल – अकबर बिरबल’ (Har Mushkil Ka Hal – Akbar Birbal) या मालिकेत एका छोट्या भूमिकेद्वारे टेलिव्हिजनवरील आपल्या प्रवासाची सुरुवात केली आणि त्यानंतर ‘एस्केप लाइव्ह’ (Escaype Live) व ‘चंद्रगुप्त मौर्य’ (Chandragupta Maurya) यांतून त्याला ओळख मिळाली.

Comments are closed.