महिलांचे प्रायव्हेट पार्ट का? होळीच्या रंगाच्या निमित्ताने अश्लिल कृत्य, अभिनेत्याच्या व्हिडीओव
होळी: संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसत आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बाजारपेठा सजल्या आहेत आणि घराघरांत मिठाई बनवली जात आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील बरसाना शहर देखील होळीच्या रंगात रंगले आहे. इथली एक गोष्ट अनोखी आहे. राधा-कृष्णाच्या प्रेमाचे साक्षीदार असलेले हे शहर आठवडाभर रंगात रंगून गेले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रसिद्ध लाठमार होळी खेळण्यासाठी बरसाना येथे पोहोचले आहेत. होळीचा हा सण एकमेकांना रंग देऊन प्रेम वाटून घेण्याचा आहे, पण यानिमित्ताने काही लोक अशा गोष्टी करतात ज्या लाजिरवाण्या असतात.
असाच एक व्हिडिओ अभिनेता आणि ब्लॉगर तुषार शुक्लाने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. होळी खेळण्यासाठी तो उत्तर प्रदेशमधील बरसाना शहर येथे पोहोचला होता. मात्र, या व्हिडिओमध्ये त्याने जे काही दाखवले आहे त्यामुळे सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. व्हिडिओमध्ये तुषारने होळीचा फायदा घेत महिला आणि मुलींशी गैरवर्तन करणाऱ्यांचा व्यक्तींचा पर्दाफाश केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, सोशल मीडिया यूजर्स अशा लोकांवर संताप व्यक्त करत आहेत.
अभिनेत्याने दुसरे चित्र दाखवले
बरसाना होळीसाठी प्रसिद्ध आहे, पण अभिनेता तुषार शुक्लाने दाखवलेला फोटो पाहून तुम्हालाही राग येईल. होळीचा फायदा घेत मुलींसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये तुषार म्हणतो की, आज मी बरसाना येथे होळी खेळण्यासाठी गेलो होतो. सर्व काही छान होते, पण मला एक प्रश्न आहे, फक्त मुलीच होळी खेळायला बरसानात जातात का? तिथे मुलं, माणसं नाहीत का? तुम्ही थेट मुली आणि महिला यांच्या प्रायव्हेट पार्टला टार्गेट करता, तुमच्या घरात माता-भगिनी नाहीत का? अशा कृत्यांमुळे कृपया अशा ठिकाणची बदनामी करू नका, असंही त्याने पुढे म्हटलं आहे.
सोशल मीडिया यूजर्स संतापले
तुषार शुक्लाच्या या व्हिडिओवर युजर्स संतापले असून सोशल मीडिया यूजर्स महिलांसोबत असे कृत्य करणाऱ्यांना शिवीगाळ करत आहेत. एका यूजरने लिहिले की, या कृत्यांमुळे आमचं शहर बदनाम होतं आहे. बहिणींनो येऊ नका, मी स्वतः येथील निवासी आहे, हे सर्व मी पाहिले आहे, राधे राधे. आणखी एका युजरने लिहिले, असे बेलगाम लोक देवाच्या या पवित्र स्थानाचे नाव खराब करतात. अशी घृणास्पद वागणूक आणि कृत्ये करणाऱ्यांना तेथील महिलांनी चपलांनी उत्तर दिले पाहिजे.
अधिक पाहा..
Comments are closed.