झोपेतच काळानं गाठलं… ‘घोस्ट’ फेम अभिनेत्रीचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन; कुटुंबाने महिन्याभरानंतर दिली माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘द फायनल एक्झिट’, ‘घोस्ट’, ‘7 अवर्स टू गो’ यासह तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राज हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. जुलै महिन्यात तिचे निधन झाले असून तब्बल महिन्याभरानंतर कुटुंबाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. वर्षभरापासून ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याने त्रस्त होती, अशी माहिती तिच्या कुटुंबाने दिली आहे. ‘एएनआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.