दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले

क्रिकेटर भानुका राजपक्षे यांची हर्षी रसंगा तक्रार: एका सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात (Case Linked To Gold Chain) प्रसिद्ध अभिनेत्रीला (Actress) अटक करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटरनं अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला अटक (Actress Arrested) केली आहे. क्रिकेटपटून धाडलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आलंय की, क्रिकेटपटून अभिनेत्रीला तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी एक सोन्याची साखळी दिली होती. मात्र, त्या अभिनेत्रीनं क्रिकेटपटूला कोणतीही कल्पना न देता, 9 लाखांची ही सोनसाखळी गहाण ठेवली. दुसरीकडे, माध्यमांमध्ये बोलताना मात्र, या अभिनेत्रीनं या घटनेची पूर्णपणे वेगळीच बाजू मांडलीय.

श्रीलंकेचा क्रिकेटपटू भानुका राजपक्ष (Sri Lankan Cricketer Bhanuka Rajapaksa) यानं अभिनेत्री हर्षी रसंगा (Harshi Rasanga) हिला कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली होती, ज्यानंतर पोलिसांनी त्या अभिनेत्रीला अटक (Actress Arrested) केली. हे प्रकरण एका सोन्याच्या साखळीशी संबंधित आहे. राजपक्ष यानं नोटीसमध्ये सांगितलंय की, त्यानं ती सोन्याची साखळी अभिनेत्री हर्षी हिला केवळ तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी दिली होती. मात्र, त्या अभिनेत्रीनं राजपक्ष याला कोणतीही पूर्वकल्पना न देता, 9 लाख रुपयांची ही सोन्याची साखळी गहाण ठेवली. क्रिकेटर भानुका राजपक्ष यानं कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

कडुवेला दंडाधिकारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, हर्षी रसंगा हिनं आपण क्रिकेटपटू भानुका राजपक्ष (Bhanuka Rajapaksa) याला न कळवता ती साखळी गहाण ठेवल्याचं कबूल केलंय. आपल्या वकिलांमार्फत हर्षीनं ती साखळी परत करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्या अभिनेत्रीनं यु-टर्न घेतला आणि या घटनेबाबत पूर्णपणे विसंगत अशीच माहिती पुन्हा मांडली.

अभिनेत्रीला जामीन मंजूर (Actress Granted Bail)

न्यायालयानं अभिनेत्री हर्षी रसंगाला प्रत्येकी 5,00,000 रुपयांचं दोन वैयक्तिक जामीन सादर केल्यानंतर जामीन मंजूर केला. दरम्यान, जामीनावर सुटका झाल्यानंतर, या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर जे वक्तव्य केलंय त्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, क्रिकेटर भानुका राजपक्ष आणि तिचे प्रेमसंबंध होते. ती सोनसाखळी भानुका राजपक्ष यानंच अभिनेत्रीला भेट म्हणून दिलेली. अभिनेत्रीच्या वक्तव्यावर क्रिकेटपटू हर्षी रसंगानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कडुवेला दंडाधिकारी न्यायालयानं थलंगमा पोलिसांना या खटल्याच्या पुढील सुनावणीदरम्यान ती सोन्याची साखळी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या खटल्याची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी आहे.

भानुका राजपक्ष यानं IPL खेळलीय… (Cricketer Bhanuka Rajapaksa)

भानुका राजपक्ष यानं श्रीलंकेच्या क्रिकेट संघासाठी 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, या दोन्ही प्रकारांमध्ये अनुक्रमे 89 आणि 744 धावा केल्या आहेत. त्यानं आपला शेवटचा एकदिवसीय सामना 2021 मध्ये, तर शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळला होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) त्यानं ‘पंजाब किंग्स’कडून दोन सीझन्स खेळले होते. 2022 च्या हंगामात, त्यानं 9 सामने खेळून 206 धावा केल्या होत्या. 2023 मध्ये, त्यानं केवळ 4 सामने खेळले आणि एकूण 71 धावांचीच नोंद केलेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप

आणखी वाचा

Comments are closed.