Photo – अभिनेत्री पूजा सावंत दिसणार पोलिसाच्या भूमिकेत
मराठी चित्रपटसृष्टीत दररोज नवनवे प्रयोग आता पाहायला मिळतात. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिने देखील एक वेगळ्या धाटणीची भूमिकेचे आव्हान स्वीकारले आहे.

आगामी सालबर्डी या चित्रपटात पूजा सावंत ही एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच झाला असून यातून पी.आय.मनोरमा प्रधान या तिच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.