Photo – चेटकिणीच्या लूकमधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे या लवकरच आपल्याला चेटकिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहच्या काजळमाया या मालिकेतून कनकदत्ताची भूमिका साकारणार आहेत.
विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका असून या मालिकेत पर्णिकाच्या आईच्या भूमिकेत प्रिया बेर्डे दिसणार आहेत.
Comments are closed.