1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस; कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीचा जलवा

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर तिच्या पहिल्याच लूकने खळबळ उडवून दिली. उर्वशीने एका आकर्षक आणि महागड्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. 1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस, लाखोंची पर्स… कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीचा जलवा दिसून आला.
उर्वशीच्या गाऊनची खासियत केवळ त्याची किंमतच नाही तर त्याची अद्भुत रचनादेखील आहे. उर्वशीचा हा गाऊन मेक्सिकन कलेपासून प्रेरित आहे. त्याच्या निर्मितीमध्ये हजारो तास खर्च करण्यात आले आणि त्यात उत्कृष्ट क्रिस्टल्स, मौल्यवान हिरे आणि विविध प्रकारचे कापड वापरले गेले आहेत. या गाऊनची रचना मेक्सिकन आणि अॅझ्टेक कला प्रतिबिंबित करते. प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिन्को यांनी हा गाऊन डिझाईन केला आहे. उर्वशीने कोट्यवधी रुपयांचे दागिने घातले होते. तिने जवळपास 1300 कोटींचे दागिने परिधान केले होते. तिच्या दागिन्यांमध्ये मौसाईफ रेड डायमंड, ओपेनहायमर ब्लू डायमंड, ड्रेस्डेन ग्रीन डायमंड आणि टिफनी यलो डायमंड असे अनेक महागडे हिरे वापरण्यात आले.
Comments are closed.