ऑस्ट्रेलियाच्या 'या' स्टार फिरकीपटूला मिळाला 'टी20 क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार

ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाला (Adam Zampa) वर्षातील सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याशिवाय, संघाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासलाही (Sam Konstas) एक मोठे पदक देण्यात आले. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy 2024-25) मध्ये सॅम कॉन्स्टास चर्चेचा विषय होता. कॉन्स्टासचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि विराट कोहलीशी (Virat Kohli) वाद झाला होता. तत्पूर्वी हे पुरस्कार ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार 2025 दरम्यान देण्यात आले आहेत.

सॅम कॉन्स्टासने (Sam Konstas) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात, कॉन्स्टास कोहलीसोबतच्या त्याच्या संघर्षामुळे चर्चेत आला. याशिवाय, त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात बुमराहविरूद्ध आक्रमक फलंदाजी करून तो चर्चेचा विषय बनला.

ऑस्ट्रेलियन अवॉर्ड्समध्ये सॅम कॉन्स्टासला ‘ब्रॅडमन यंग क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत, कॉन्स्टासने 2 कसोटी सामन्यांत 28.25च्या सरासरीने 113 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 1 अर्धशतक देखील झळकावले आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाने (Adam Zampa) 2024 मध्ये एकूण 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या सामन्यांच्या 21 डावात त्याने 17.20च्या सरासरीने 35 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 12 धावात 4 विकेट अशी होती. यंदा झाम्पाने 100 टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा ओलांडला. तो ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 विकेट्सचा टप्पा गाठणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत आरएफवायसी, ब्रदर्स स्पोर्टस असोसिएशन संघाची विजयी सलामी
हे चार संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचतील, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंंदाज
कर्णधार सूर्याची कामगिरी अतिउत्तम, पण फलंदाज म्हणून लज्जास्पद रेकाॅर्ड, पाहा आकडेवारी

Comments are closed.