ॲशेसच्या तिसऱ्या कसोटीत अॅलेक्स कॅरीची शतकी खेळी! स्टीव्ह स्मिथला मागे टाकत रचला इतिहास
इंग्लंडविरुद्ध ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीने (alex carry) एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) मागे टाकत 2025 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने 106 धावांची शानदार शतकी खेळी केली.
ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी पूर्णपणे लयीत दिसला. त्याने 143 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 106 धावा केल्या. बाद होण्यापूर्वी त्याने स्मिथचा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
अॅलेक्स कॅरी आता 2025 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
स्टीव्ह स्मिथने 8 कसोटी सामन्यातील 14 डावात 618 धावा केल्या आहेत. तर अॅलेक्स कॅरीने 10 कसोटी सामन्यातील 14 डावात 671 धावा केल्या आहेत. कॅरीने या वर्षी आतापर्यंत 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने वर्षातील पहिले शतक फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध (156 धावा) केले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या भारताचा कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill) नावावर आहे. त्याने 9 कसोटी सामन्यातील 16 डावात 983 धावा केल्या आहेत.
70.21 च्या सरासरीने 5 शतके झळकावली आहेत.
Comments are closed.