अधीर चौधरी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
नवी दिल्ली
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. बंगाली भाषिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी यांनी पंतप्रधानांना केले आहे. पश्चिम बंगालच्या अनेक हिस्स्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. तसेच बांगलादेश सीमा राज्याला लागून आहे. देशाच्या अन्य हिस्स्यांमध्ये बंगाली भाषिकांना लक्ष्य केले जात असल्याने पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढत असल्याचा दावा चौधरींनी केला आहे.
Comments are closed.