Aditya Thackeray makes serious allegations that BJP is planning a strategy to wrap up the Ladki Bahin scheme
लाडकी बहीण योजना लवकरच बंद केली जाईल, असा दावा विरोधकांकडून होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी या योजनेबाबत मोठा खुलासा करताना भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी टर्निंग पॉइंट ठरली होती. मात्र विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीने आश्वासन दिलेले 2100 रुपये महिलांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे विरोधक महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच नमो शेतकरी आणि लाडकी बहीण अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपयेच मिळणाच असल्याची चर्चा होताना दिसली. तसेच लाडकी बहीण योजना लवकरच बंद केली जाईल, असा दावाही विरोधकांकडून होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी या योजनेबाबत मोठा खुलासा करताना भाजपावर गंभीर आरोप केला आहे. (Aditya Thackeray makes serious allegations that BJP is planning a strategy to wrap up the Ladki Bahin scheme)
पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना मोठ्या उत्साहाने जाहीर केली. मात्र या योजनेबाबतचे कोणतेही नियोजन महायुती सरकारकडे नाही. हे आता सगळ्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारची आता मोठी तारांबळ उडत आहे. लाडक्या बहिणींना अनुदान देण्याबाबत सरकारकडून अडचणी सांगितल्या जात आहेत. आतापर्यंत आठ लाख महिलांना त्यातून वगळले आहे. यानंतर आता भाजपा आपल्याच एखाद्या पाठीराख्यामार्फत उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्याची शक्यता आहे. या याचिकेद्वारे लाडकी बहीण योजना बंद करावी, अशी मागणी करण्यात येईल. सरकार त्याबाबत तांत्रिक मुद्दे पुढे करेल आणि उच्च न्यायालयामार्फत ही योजना बंद करण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो, अशा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
हेही वाचा – Hindi Language Controversy : आदित्य ठाकरेंनी सांगितलं भेटीगाठीचं ‘राज’कारण
सरकार अपयशी
महायुती सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या बहुमतासह सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सत्तेत आल्यापासून सरकारचा हनिमून पिरियड समजला जात आहे. मात्र हे सरकार विविध वादग्रस्त विषय पुढे करून सरकारच्या कामकाजापासून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे. कारण गेल्या शंभर दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती, त्याचं पुढे काय झालं? महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर काही उपाय झाला आहे का? बेरोजगार, विद्यार्थी, महिला यापैकी कोणासाठी तरी सरकारने कोणती योजना आणली का? असे प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला अपयशी म्हटले आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : आयोगाच्या अध्यक्षांकडून शेकडो कोटींचा भ्रष्टाचार; सुषमा अंधारेंचा आरोप
Comments are closed.