पाकिस्तानी गोळीबारात प्रशासकीय अधिकारी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये होते नियुक्त
पाकिस्तान सैन्याकडून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागाला लक्ष्य करत केल्या जाणाऱ्या गोळीबारात काही प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आता जम्मू-काश्मीरच्या प्रशासनातील एक अधिकाऱ्याच्या घराला लक्ष्य करत पाकिस्तानने गोळीबार केला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री अब्दुल्लांनी व्यक्त केले दु:ख
राजौरी येथे झालेल्या गोळीबारात आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेच्या एका समर्पित अधिकाऱ्याला गमाविले आहे. हा अधिकारी शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांसोबत राजौरी जिल्ह्यात स्थितीची पाहणी करत होता. तसेच माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामील झाला होता. राजौरी येथे या अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. या गोळीबारात आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
कोण होते राजकुमार थापा?
राजकुमार थापा यांचा जन्म 28 एप्रिल 1971 रोजी झाला होता. थापा यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. सध्या ते जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेत कार्यरत होते. राजौरीमध्ये 2021 साली त्यांना नियुक्ती मिळाली होती. राजकुमार थापा वर्तमानात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्ताच्या पदावर कार्यरत होते.
Comments are closed.