ताप आल्यानं रात्री उपचारांसाठी दाखल केलं; सकाळी शिवसैनिकाचा मृत्यू; विक्रोळीतील घटना, रुग्णालया

विक्रोळी: विक्रोळी परिसरातील एका स्थानिक शिवसैनिकाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. चेतन ठाकूर असे मृत शिवसैनिकाचे (Shivsena Leader Death) नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली असून, रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.(Shivsena Leader Death)

Shivsena Leader Death:  नेमकी घटना काय?

चेतन ठाकूर यांना काल रात्री तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी विक्रोळीतील ‘आदि आरोग्य’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज सकाळी अचानक त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. साध्या तापाने रुग्णाचा मृत्यू कसा झाला? असा सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

Shivsena Leader Death:  रुग्णालयाबाहेर तणाव; आमदारांची उपस्थिती

चेतन ठाकूर यांच्या निधनानंतर रुग्णालयात स्थानिक शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, शिवसैनिकांनी रुग्णालयावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीवर ठाम भूमिका घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.

Shivsena Leader Death:  पोलीस प्रशासनाची धावपळ

रुग्णालयाबाहेर वाढत असलेली गर्दी पाहता परिसरात राडा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, नागरिकांना आणि शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका ठाकूर कुटुंबीयांनी घेतल्याने तणावाचे वातावरण कायम आहे. पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

आणखी वाचा  –

Ketan Agrawal Case : केतनला संपवण्याच्या कटाची ‘त्या’ तिसऱ्या तरुणाला पूर्ण कल्पना! चेतनच्या मित्राला पुणे पोलिसांनी उचललं, बीड कनेक्शन उघड, त्याने…

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: सिया आणि चेतनची आज कोठडी संपणार; पोलीस कोर्टात नसरापूरप्रकरणातील ती थिअरी मांडणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

हेदेखील वाचा

Comments are closed.