हैदराबादची गल्ली ते सिलिकॉन व्हॅली; 450 कोटींचे पॅकेज, 18 वर्षे टेक इंडस्ट्रीवर केले राज्य, ‘अ‍ॅडोब’चे सीईओ शंतनू नारायण यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एआय काळात जगभर वाढत्या स्पर्धेत कंपनी टिकून राहण्याच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झाल्यामुळे अ‍ॅडोब इंक.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ शंतनू नारायण 18 वर्षांनंतर पदावरून पायउतार होणार आहेत. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नारायण यांनी त्यांचा उत्तराधिकारी निश्चित होईपर्यंत या पदावर कायम राहणार असल्याचे जाहीर केले.

शंतनू नारायण यांना आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंदाजे 450 कोटी रुपये पॅकेज देण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी या घोषणेनंतर एक खास पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये नारायण यांच्या ‘मैत्री आणि मार्गदर्शनाबद्दल’ त्यांचे कौतुक केले.

कोण आहेत शंतनू नारायण

शंतनू नारायण यांनी जवळ जवळ दोन दशकांपासून अ‍ॅडोब सीईओ म्हणून कंपनीचे नेतृत्व केले आहे. मूळचे हैदराबादचे आणि तिथेच लहानाचे मोठे झालेले नारायण आज सिलिकॉन व्हॅलीमधील सर्वात प्रभावशाली अधिकाऱ्यांपैकी मानले जातात. 1980 च्या दशकात परदेशात गेलेल्या आणि जागतिक आयटी कंपन्यांना आकार देणाऱ्या हिंदुस्थानी अभियंत्यांच्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करतात.

शक्तिशाली कंपनीची धुरा सांभाळली

1998 मध्ये शंतनू अ‍ॅडोबमध्ये सामील झाले आणि 2005 मध्ये अध्यक्ष व 2007 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नारायण यांच्या नेतृत्वात अ‍ॅडोबमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि कर्मचाऱ्यांची संख्या तीन हजारांवरून 30 हजारांपेक्षाही जास्त वाढली. आपल्या कार्यकाळात शंतनू नारायण यांनी अ‍ॅडोबला पारंपरिक सॉफ्टवेअर लायसेन्स मॉडेलपासून क्लाऊड-आधारित सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन मॉडेलकडे नेले.

2025 हुरुन रिच लिस्टनुसार शंतनू नारायण यांची एकूण संपत्ती अंदाजे 4,670 कोटी आहे.

Comments are closed.