दहशतवादी संघटनेद्वारे डेड ड्रॉप धोरण स्वीकारणे
टूलकिटही करण्यात आले होते तयार
सर्कल संस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. यंत्रणेने काही दिवसांतच अत्यंत महत्त्वाची माहिती मिळविली असून याच्या आधारावर तपास पुढे जाणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला एका टूलकिटचा हिस्सा होता आणि भविष्यात अशाप्रकारचे हल्ले दहशतवादी करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यासाठी पूर्वीच टूलकिट तयार करण्यात आले होते. याच्या अंतर्गत दहशतवादी कसा हल्ला करणार, त्यांना शस्त्रास्त्रs कुठून मिळणार आणि कुठल्या स्थानी कधी हल्ला करावा, हे दहशतवादी म्होरक्यांनी ठरविले होते. या टूलकिटच्या अंतर्गत एक पॉलिसीही निश्चित करण्यात आली होती, याला डेड ड्रॉप पॉलिसी संबोधिले जात आहे.
या टूलकिटमध्ये दहशतवादी हल्ल्यावरून बारीक तपशीलही निश्चित करण्यात आला होता. हे टूलकिट क्रूर दहशतवादी हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबाची एक शाखा तहरीक-ए-पशबानने तयार केले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या टूलकिटच्या अंतर्गत डेड ड्रॉप पॉलिसी ठरविण्यात आली होती. या पॉलिसीत कुणालाही सुगावा लागू नये अशाप्रकारे दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचे नियोजन होते. दहशतवादी संघटनेकडून तयार डेड ड्रॉप पॉलिसीच्या अंतर्गत दहशतवादी एकत्र येतात आणि परस्परांमध्ये शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करतात, पूर्वीपासून एकमेकांना ओळखत नसलेल्या दहशतवाद्यांना हल्ल्याची जबाबदारी सोपविलेली असते, असे समोर आले आहे.
या डेड ड्रॉप पॉलिसीच्या अंतर्गत दहशतवादी म्होरक्यांचे हस्तक शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी करतात, लोकांचा वावर कमी असलेल्या ठिकाणी हे हस्तक शस्त्रास्त्रs पोहोचवितात, याकरता पार्क आणि दफनभूमी यासारख्या ठिकाणांची निवड केली जाते. काही सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून या टूलकिटला दहशतवाद्यांदरम्यान शेअर करण्यात आले आहे. या टूलकिटच्या अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून आणला गेल्याचे मानले जात आहे. काही दहशतवादी पूर्वीच तेथे लपून बसले होते आणि मग आणखी काही दहशतवादी तेथे पोहोचले होते.
Comments are closed.