Adulterated Sago : श्रावणात उपवास करताय? मग सावधान! बाजारात आला भेसळयुक्त शाबुदाणा

साबुदाणा… उपवास म्हंटले की आपण हमखास साबुदाण्याचे पदार्थ बनवतो. पण तुम्हाला माहित आहे का? आजकाल बाजारात भेसळयुक्त साबुदाणा मिळत आहे. अधिक नफ्यासाठी हा साबुदाणा पॉलिश आणि रसायनांनी तयार केला जातो, ज्यामुळे दिसायला तो चांगला वाटू शकतो पण आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशा वेळी हा भेसळयुक्त साबुदाणा कसा ओळखायचा? आणि त्याचे परिणाम काय होतात ते जाणून घेऊया…

भेसळयुक्त साबुदाण्यांमध्ये सोडियम, हायपोक्लोराईट, कॅल्शियम, हायपोक्लोराईट, ब्लिचिंग, एजंट, फॉस्फोरिक, अॅसिड इत्यादींचा वापर करून ते तयार केले जातात. या रसायनांपासून बनवलेला साबुदाणा सामान्य माणूस ओळखू शकत नाही. भेसळयुक्त साबुदाणा शरीरात विषारी द्रव्ये तयार करतो, ज्यामुळे शरीराच्या अनेक भागांना धोका निर्माण होतो.

भेसळयुक्त साबुदाणा आरोग्यासाठी हानिकारक
सळयुक्त शाबुदाण्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे पोटात गॅस, अपचन, उलट्या-जुलाब होऊ शकतात आणि यकृतावर परिणाम होऊ शकतो. ते खाल्ल्याने मुले आणि वृद्धांमध्ये अन्न विषबाधा होऊ शकते. पोटदुखी, त्वचेचा संसर्ग, रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम, जडपणा असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे भेसळयुक्त साबुदाणा आरोग्यासाठी हानिकारक असतो.

भेसळयुक्त साबुदाणा ओळखायचा कसा?

  • भेसळयुक्त साबुदाणा ओळखण्यासाठी एक सोपा उपाय आहे. थोडासा साबुदाणा घ्या आणि तो तोंडात ठेवून थोडा वेळ चघळा, जर तुम्हाला हा साबुदाणा कडक वाटत असेल तर तो भेसळयुक्त साबुदाणा आहे. तर नैसर्गिक साबुदाणा काही वेळ चघळल्यानंतर स्टार्च निघून जातो आणि थोडासा चिकट वाटू लागतो.
  • पाण्यात साबुदाणा टाकून बघा. पाण्यात टाकल्यावर काही वेळाने साबुदाणा फुगेल आणि खाली बसेल तसेच पाण्याला चिकटपणा येईल तो साबुदाणा नैसर्गिक असेल. तर भेसळयुक्त साबुदाणा हा पाण्यात टाकल्यावर फुगत नाही. आणि पाणीही स्वच्छ राहते.
  • याशिवाय तुम्ही साबुदाणा जाळूनही टेस्ट करू शकता. त्यासाठी थोडासा साबुदाणा घेऊन त्याला आग लावा. काही काळ जाळल्यानंतर भेसळयुक्त साबुदाण्याची राख होते आणि खरा साबुदाणा राख सोडत नाही.

Comments are closed.