अॅड. मनमोहन चोणकर यांचा उद्या अमृत महोत्सव
शिवसेनेचे माजी नगरसेवक, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष आणि नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा शुक्रवार, 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजता दादरच्या सूर्यवंशी सभागृहात होणार आहे. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अॅड. मनमोहन चोणकर हे 2007 ते 2012 य़ा काळात शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यांनी मुंबई महापालिकेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मुंबईचे आद्यशिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी वडाळा येथे भूखंड मिळाला. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे यासाठी चोणकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या या संघर्षमय कार्याची कृतज्ञता म्हणून त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते अॅड. चोणकर यांच्या जीवनकार्यावरील स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे.
Comments are closed.