आसाममध्ये आज फायदा शिखर परिषद

पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री व उद्योगपतींची उपस्थिती

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामची राजधानी गुवाहाटी येथे मंगळवार आणि बुधवारी अॅडव्हान्टेज शिखर संमेलन होणार आहे. या 2025 च्या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी करतील. या कार्यक्रमाला एस जयशंकर, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल, निर्मला सीतारामन हरदीप पुरी, सर्वानंद सोनोवाल आणि पवित्रा मार्गेरिटा असे अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील. तसेच अॅडव्हान्टेज आसाम 2.0 शिखर परिषदेत एन चंद्रशेखरन, मुकेश अंबानी, गौतम अदानी, सज्जन जिंदाल, प्रशांत रुईया, अनिल अग्रवाल, अनिल कुमार चालमलसेट्टी यांच्यासह अनेक व्यावसायिक नेते उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात अनेक देशांतील लोकही सहभागी होतील. ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, तैवान, इंडोनेशिया, थायलंड, भूतान आणि जपानमधील उद्योगपतींचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. शिखर परिषदेपूर्वी, राज्य सरकारने ब्रिटन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, भूतान आणि यूएई व्यतिरिक्त भारतातील प्रमुख शहरांमध्ये अनेक रोड शो आयोजित केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: भूतान, जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर येथे शिष्टमंडळांचे नेतृत्व केले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर काझीरंगामध्ये दाखल

अॅडव्हान्टेज आसाम 2.0 शिखर परिषदेपूर्वी गुंतवणुकीचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. आसाम मंत्रिमंडळाने 1.22 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. दुसरीकडे, शिखर परिषदेपूर्वी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी 45 देशांच्या राजदूतांसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारीचा आनंद घेतला. पर्यटकांची वाढती संख्या पाहून मला खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अधिक पर्यटक आणि गुंतवणूकदार आणायचे आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.