AFG vs ENG : अफगाणिस्तानने सर्वांच्या झोपा उडवल्या, इंग्लंडला धू धू धूतलं, Ibrahim Zadran चमकला

एएफजी वि इंजी: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज (दि.26) अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा संघ आमने-सामने आहे. दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने इंग्लंडला धू धू धुतलंय…Ibrahim Zadran च्या शतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने 325 धावा केल्या असून इंग्लंडसमोर 326 धावांचं लक्ष ठेवलंय. Ibrahim Zadran  ने 177 धावांची नाबाद खेळी करत धावांचा डोंगर उभा केलाय. त्यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी उतलेल्या संघाने सुरुवातीलाच दोन विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Ibrahim Zadran ची शतकी खेळी

Ibrahim Zadran शिवाय कर्णधार हशमतुल्ला शाहिदी, मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनीही छोट्या खेळी खेळत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 बळी घेतले. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरुवातीला खराब ठरला असल्याचे बोलले जात होता. कारण 37 धावांपर्यंत अफगाण संघाच्या 3 विकेट पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर इब्राहिम झद्रानने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीच्या साथीने 104 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन केले. शाहिदीने 40 धावा केल्या. त्यानंतर झद्रानने अजमतुल्ला ओमरझाईसोबत 72 धावांची आणि मोहम्मद नबीसोबत 111 धावांची जलद भागीदारी केली.


इब्राहिम झद्रानने या सामन्यात 177 धावांची खेळी करत अनेक विक्रम केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यासह तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. झद्रानने 177 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकार लगावले.

याच मैदानावर इंग्लंडने यापूर्वी खेळताना 351 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात जोश इंग्लिशच्या 120 धावांच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने तो सामना 5 गडी राखून जिंकला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तानने पहिले सामने गमावले आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.