AFG vs ZIM: रशीदची फिरकी आणि झद्रानच्या मॅचविनिंग इनिंगच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव करत मालिका ताब्यात घेतली.

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (31 ऑक्टोबर) हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डिऑन मायर्स 6 धावा करून बाद झाला, तर ब्रायन बेनेटही 16 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. ब्रेंडन टेलर केवळ 3 धावा करून बाहेर पडला. कर्णधार सिकंदर रझाने दमदार फलंदाजी करत ३७ धावा केल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या १२५ धावांपर्यंत पोहोचली.

अफगाणिस्तानसाठी कर्णधार राशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ बळी घेतले. मुजीब उर रहमान आणि अब्दुल्ला अहमदझाई यांनी प्रत्येकी 2, तर फरीद अहमद आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात दमदार होती. रहमानउल्ला गुरबाज 16 धावा करून धावबाद झाला, पण इब्राहिम झद्रानने एका टोकाकडून शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने 51 चेंडूत 7 चौकारांसह 57 धावांची नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळली. याशिवाय दरविश रसूलीने 17 धावा आणि अजमतुल्ला उमरझाईने 13 चेंडूत 25 नाबाद धावा जोडून संघाला 12 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने 2 आणि वेलिंग्टन मसाकादझाने 1 बळी घेतला.

या विजयासह अफगाणिस्तानने मालिका 2-0 अशी जिंकली आहे. आता दोन्ही संघांमधील तिसरा आणि शेवटचा सामना याच मैदानावर रविवारी (२ नोव्हेंबर) होणार आहे.

Comments are closed.