मुस्तफिजुर रहमानबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू संतापला! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?

गेल्या काही दिवसांपासून मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून (IPL) रिलीज केल्याचा विषय चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूचनेनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रहमानला संघातून बाहेर केले होते. यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) इतके संतापले की त्यांनी टी-20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर आयोजित करण्याची मागणी केली.

याच मुद्द्यावर अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबीला प्रश्न विचारला असता तो चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. मोहम्मद नबी सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ‘नोआखाली एक्स्प्रेस’ संघाकडून खेळत आहे. एका पत्रकार परिषदेत बांगलादेशी पत्रकाराने त्याला मुस्तफिजुर रहमान वादाबद्दल प्रश्न विचारला. यावर संताप व्यक्त करत नबी म्हणाला की, त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

पत्रकारावर वैतागून नबी म्हणाला, याचा माझ्याशी काय संबंध भाऊ? माझं मुस्तफिजुरशी काय काम? आणि राजकारणात (Politics) माझं काय काम आहे? नबीने पुढे असेही स्पष्ट केले की मुस्तफिजुर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला जो प्रश्न विचारला गेला तो विचारण्याची गरज नव्हती.

भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुर रहमानला रिलीज करावे लागले. केकेआरने मिनी लिलावात त्याला 9.2 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या बांगलादेशी खेळाडूवर लागलेली ही सर्वात मोठी बोली होती. मात्र, लिलावापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या घटना समोर येत होत्या, तरीही केकेआरने त्याला मोठी रक्कम देऊन खरेदी केल्यामुळे या फ्रँचायझीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

Comments are closed.