विराट कोहलीशी भिडणाऱ्या खेळाडूची संघात एन्ट्री, आशिया कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, जाणून घ्या
एशिया कप 2025 साठी अफगाणिस्तान पथक: आशिया कप 2025 यंदा यूएईमध्ये रंगणार आहे आणि या वेळी एकूण 8 संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपला अधिकृत संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व स्टार लेग-स्पिनर राशिद खान करणार आहे. मोहम्मद नबी आणि अजमतुल्लाह उमरजई यासारखे ऑलराऊंडरही यावेळी मैदानात उतरणार आहेत.
गुरबाझ-जाद्रांची सलामीची जोडी
अलीकडच्या काही दिवसात रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी अफगाणिस्तानसाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांकडे ओपनिंगची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत मोहम्मद नबी आणि गुलबदीन नईबसारखे अनुभवी खेळाडू संघाला बळ देतील.
𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐀𝐋𝐄𝐑𝐓! 🚨
एसीसी पुरुषांच्या टी -20 एशिया कप 2025 साठी अफगाणातालनची पथक येथे आहे, जी युएईमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. 🤩
आशिया चषकपूर्वी, अफगाणातलनला टी -२० ट्राय-नेशन मालिकेत यजमान युएई आणि पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. pic.twitter.com/5uxxuxkmma
– अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (@acbofficial) ऑगस्ट 24, 2025
विराट कोहलीशी भिडणाऱ्या खेळाडूची संघात एन्ट्री
आयपीएल 2023 मधील सर्वात मोठ्या चर्चेचा विषय बनला होता तो म्हणजे विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील मैदानावरील वाद. मे 2023 मध्ये लखनौ येथे झालेल्या त्यांच्या संघाच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन यांच्यात जोरदार वाद झाला होता. ज्याने अफगाणिस्तानसाठी शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2024 मध्ये खेळला होता.
पण, यावेळी वेगवान गोलंदाजीची धुरा नवीन उल हक सांभाळताना (Naveen-ul-Haq returns Afghanistan Squad) दिसेल. आतापर्यंतच्या 67 टी-20 बळींनी तो संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्याला साथ देण्यासाठी फजलहक फारुकी संघात आहे. तर फिरकी विभागात राशिद खान, नूर अहमद आणि अल्लाह गजनफर या तिन्ही फिरकीपटूंवर मोठी जबाबदारी असणार आहे.
अफगाणिस्तान संघाचे आशिया कपचे वेळापत्रक
अफगाणिस्तान संघाचा आशिया कप 2025 मधील पहिला सामना 9 सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरला बांग्लादेश आणि 18 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध शेवटचा गटसामना खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानची निवड ग्रुप-बी मध्ये झाली आहे.
आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तान संघ : (Afghanistan Squad Asia Cup 2025)
रशीद खान (कर्नाधर), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरन, दार्विश रसुली, सीडिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमराजाई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबादिन नायब, शरफुद्दीन नायब, मोहम्मद इश्माद मलिक, नवीन-उल्लाहक, नवीन-उल्ला-हक, फारोकी
राखीव खेळाडू – वफिउल्ला तरखिल, नांगयाल खरोटे, अब्दुल्ला अहमदझाई.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.