वर्षभरात तीनच आंतरराष्ट्रीय लीग खेळण्याची मुभा, क्रिकेट बोर्डाचा नवा नियम खेळाडूंच्या अंगलट

मागील काही वर्षापासून जगभरात अनेक टी20 लीग सुरू झाल्या जात आहेत. या लीगमध्ये खेळण्यासाठी काही खेळाडूंनी तर चक्क त्यांच्या राष्ट्रीय संघाचे करार धुडकावत लीग क्रिकेटला पसंती दिली आहे. यावरून खेळाडूवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही क्रिकेट बोर्डांनी कडक निर्णय घेतले आहेत. याबाबतच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने (एसीबी) गुरूवारी (15 जानेवारी) काबुलमध्ये झालेल्या वार्षिक चर्चासत्रात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्वाचा निर्णय तो म्हणजे एक खेळाडू एका वर्षात केवळ तीनच आंतरराष्ट्रीय लीग खेळू शकतो, तसेच त्याला बोर्डाची लीगही खेळावी लागेल.

एसीबीने त्यांच्या नवीन नियम लागू करण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले, “खेळाडूंच्या फिटनेस आणि मानसिक स्थितीच्या काळजीसाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच खेळाडू लीगबरोबर राष्ट्रीय संघाकडूनही खेळेल असे नियोजन आहे.” या चर्चासत्रात एसीबीचे सीईओ नसीम खान आणि बोर्डचे सभासदांनी सहभाग घेतला होता.

एसीबीच्या या नवीन नियमांमुळे राशिद खान, नूर अहमद आणि रहमानुल्लाह गुरबाज यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच एसीबी या वर्षापासून एक लीग सुरू करणार असून ती युएईमध्ये खेळली जाणार आहे. या लीगमध्येही अफगाणिस्तानच्या खेळाडूंना खेळणे अनिवार्य आहे. या निर्णयामुळे खेळाडूंचा त्यांचा वर्कलोड, फिटनेस यांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा राशिद सध्या एसए20च्या (दक्षिण आफ्रिका टी20 लीग) एमआय केपटाऊनचा कर्णधार असून तो आयपीएलच्या गुजरात टायटन्सचा देखील महत्वाचा खेळाडू आहे. तसेच तो एमआय अमिराती ( आयएलटी20) आणि एमआय न्यूयॉर्क (एमएलसी) यांच्याकडूनही खेळतो.

Comments are closed.